28 September 2020

News Flash

नासाने शोधली नवी सूर्यमाला!

नवी सूर्यमाला पृथ्वीपासून २ हजार ५४५ प्रकाश वर्षे लांब अंतरावर

फोटो सौजन्य-एएनआय

अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे. ‘केप्लर स्पेस’ टेलिस्कोपद्वारे हा शोध घेण्यात आला आहे. नासाचे हे मोठे यश मानले जाते आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातली बातमी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या नासा गूगलसोबत ‘एलियन वर्ल्ड’चा शोध घेते आहे. केप्लर स्पेस टेलिस्कोपद्वारे या नव्या सूर्यमालेचा शोध लावण्यात आला आहे. या सूर्यमालेत ८ ग्रह आहेत. नासाकडून या संदर्भातली कोणतीही घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

आपल्या सूर्यमालेत ज्याप्रमाणे सूर्याभोवती ग्रह फिरत आहेत अगदी त्याचप्रमाणे नव्या सूर्यमालेतही एका ताऱ्याभोवती ग्रह फिरत आहेत. पृथ्वीसारखा एखादा ग्रह या सूर्यमालेत आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र नव्या सूर्यमालेत ‘केप्लर ९०’ नावाच्या ताऱ्याभोवती चारही बाजूने इतर ग्रह फिरताना दिसत आहेत असे  नासाने म्हटले आहे. ही नवी सूर्यमाला पृथ्वीपासून २ हजार ५४५ प्रकाश वर्षे लांब असल्याची माहितीही समोर आली आहे.

नवी सूर्यमाला पृथ्वीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी मोठी आहे. तुम्हाला भेट द्यायला आवडेल अशी ही सूर्यमाला नाही. असे मत अँड्र्यू व्हेंडरबर्ग या खगोलशास्त्रज्ञाने नोंदवले आहे. नवी सूर्यमाला कशी आहे या संदर्भातले काही व्हिडिओही नासाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

पाहा व्हिडिओ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 11:11 am

Web Title: nasa finds another solar system with eight planets just like ours
टॅग Nasa
Next Stories
1 सर्व प्रांतांच्या संरक्षणासाठी भारत सक्षम!
2 रणधुमाळीत महिला उमेदवार दुर्लक्षितच
3 विशेष न्यायालयांना तातडीने निधी देण्याचा सरकारला आदेश
Just Now!
X