20 September 2018

News Flash

‘नासा’चे तंत्रज्ञान वापरून तिप्पट उत्पादन देणारी गव्हाची प्रजाती विकसित

यात रोपांची वाढ खूप झपाटय़ाने होते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नासा या अमेरिकी अवकाश संस्थेच्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी गव्हाची प्रजाती विकसित केली आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन तीनपटींनी वाढणार आहे. नासाच्या प्रयोगात सतत सूर्यप्रकाशात रोपे राहतात. यात रोपांची वाढ खूप झपाटय़ाने होते.

HOT DEALS
 • BRANDSDADDY BD MAGIC Plus 16 GB (Black)
  ₹ 16199 MRP ₹ 16999 -5%
  ₹1620 Cashback
 • Sony Xperia XZs G8232 64 GB (Warm Silver)
  ₹ 34999 MRP ₹ 51990 -33%
  ₹3500 Cashback

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील ली हिकी या संशोधकाने सांगितले, की जलद वाढ तंत्र वापरताना त्यात गहू, चवळी व बार्ली यांची सहा पिढय़ांतील रोपे तर कॅनोलाची चार पिढय़ांतील रोपे एका वर्षांत वाढवण्यात आली. यात विशिष्ट प्रकारचे काचगृह वापरण्यात आले होते. नियंत्रित वातावरणात वाढवण्यात आलेल्या प्रयोगात सूर्यप्रकाश भरपूर ठेवला होता. २०५०पर्यंत जगात अन्नधान्य उत्पादनात ६० ते ८० टक्के वाढ केली तरच लोकांना अन्न मिळू शकणार आहे, त्यामुळे उत्पादनवाढीच्या या प्रयोगाला महत्त्व आहे. २०५०पर्यंत जगाची लोकसंख्या ९ अब्ज असणार आहे. अधिक वेगाने वनस्पतींची वाढ करण्याचे प्रयोग हे संशोधनात केले जात होते ते आता प्रत्यक्ष वापरात आणण्याची वेळ आली आहे. डो अ‍ॅग्रोसायन्सेस बरोबर भागीदारीत हे तंत्र वापरून गव्हाची डीएस फॅरेडे ही नवी प्रजाती विकसित करण्यात आली असून, ती या वर्षीच वितरित होणार आहे.

डीएस फॅरेडे ही जास्त प्रथिने असलेली गव्हाची प्रजाती असून त्यात लवकर अंकुरण होते. या गव्हात काही जनुके समाविष्ट करण्यात आली असून, त्यामुळे ही प्रजाती जास्त ओलसर हवामानातही टिकते. ऑस्ट्रेलियात गेली चाळीस वर्षे ही समस्या सोडवण्याचे प्रयत्न चालू होते. पीएच.डी.च्या विद्यार्थिनी अ‍ॅमी वॉटसन या संशोधनाच्या सहलेखिका असून, जर्नल नेचर प्लांट्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. फलोद्यान व ऊध्र्व शेती पद्धतीतही या तंत्राचा वापर होणार आहे.

डीएस फॅरेडे गहू प्रजात

 • जास्त प्रथिने
 • वेगाने वाढ
 • ओलसर हवामानातही टिकण्याची क्षमता
 • गव्हाचे उत्पादन तीनपटींनी वाढणार

First Published on January 4, 2018 1:56 am

Web Title: nasa inspired speed breeding technique boosts wheat production by upto 3 times