News Flash

नासा लघुग्रहाचा पाठलाग करण्यासाठी यान पाठवणार

नासा ही अमेरिकी अवकाश संशोधन संस्था प्रथमच एका लघुग्रहाचा पाठलाग करणार आहे.

| September 8, 2016 01:43 am

नासा ही अमेरिकी अवकाश संशोधन संस्था प्रथमच एका लघुग्रहाचा पाठलाग करणार आहे. बेनू या खडकाळ लघुग्रहावर यान पाठवले जाणार असून, त्यावरील माती किंवा पदार्थ निर्वात पंपाच्या मदतीने गोळा करणार आहे. ही माती किंवा कचरा नंतर पृथ्वीवर आणला जाणार आहे. या योजनेला प्रत्यक्षात आणण्यास एकूण सात वर्षे लागणार असून, लघुग्रहाचा पाठलाग करणारे यान गुरुवारी केपकॅनव्हरॉल येथून सोडले जाणार आहे, तर २०२३ मध्ये ते नमुन्यांसह परत येणार आहे. हे अवकाशयान ४ अब्ज मैल म्हणजे अवकाशाचा बराच भाग यात व्यापला जाणार आहे. अपोलो यानांच्या मदतीने चंद्रावरील खडक आणण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच अवकाशस्थ खजिना आणला जाणार आहे. १९६० ते १९७०च्या दशकात अपोलो यानांनी चंद्रावरील खडक माती आणली होती. नासाने धूमकेतू व सौरवातातील काही घटक पृथ्वीवर आणण्यात याआधी यश मिळवले आहे. जपानने लघुग्रहाचे घटक पृथ्वीवर आणले होते व आता त्यांचा दुसऱ्या लघुग्रहाचा पाठलाग सुरू आहे. आताच्या लघुग्रह पाठलागात काही कण मिळू शकतात. नासाच्या अ‍ॅस्टरॉईड हंटर असलेल्या ओसिरिस रेक्स यानाला लघुग्रहाचा पाठलाग करण्याची कामगिरी देण्यात आली आहे. एक ते चार फटकाऱ्यांतून जे यंत्रबाहूंच्या हाती लागेल ते पृथ्वीवर आणले जाईल. टस्कनमधील अ‍ॅरिझोना विद्यापीठाच्या दाँते लॉरेटा यांनी सांगितले, की अज्ञात जगाचा शोध आता आम्ही घेत आहोत. अवकाशातील वेगळा लघुग्रह यात निवडला जाणार आहे. हबल व स्पिटझर दुर्बिणींनी यावर मोठे काम केले असून, बेनू हा लघुग्रह १६०० फूट व्यासाचा आहे व त्याच्या मध्यभागी फुगवटा आहे. कोळशाच्या रंगासारखा तो असून तेथे कोळसा भरपूर असावा. तो ४५ लाख वर्षांपूर्वी सौरमालेतील अवशेषांच्या रूपात तयार झाला असून, त्यात पृथ्वीवरील जीवसृष्टीचे रहस्य उलगडू शकते. बेनू हे नाव इजिप्त पौराणिक कथांमधून निवडले आहे. ओसिरिस हा इजिप्त देव असून त्याचे नाव या लघुग्रहास दिले आहे. ८०० दशलक्ष डॉलर्सची नासाची ही मोहीम असून बेनू हा पृथ्वी निकटचा लघुग्रह मानला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 1:43 am

Web Title: nasa launch spacecraft
Next Stories
1 अमेरिका भारताला २२ ड्रोन विमाने देणार
2 गडकरींकडून बैठकांचा धडाका
3 पर्थमधील ‘ताजमहाल’ बेकायदा
Just Now!
X