पुढच्या चार दिवसात ‘विक्रम’बद्दल ठोस माहिती समजू शकते. नासाने २००९ साली चंद्रावर शोध मोहिमेसाठी पाठवलेला ऑर्बिटर १७ सप्टेंबरला विक्रमचे लँडिंग झाले त्या भागातून जाणार आहे. या ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने ४० वर्षापूर्वीच्या मानवी चंद्र मोहिमेच्या पावलाचेही फोटो पाठवले होते. त्यामुळे विक्रमची माहिती मिळण्याची शक्यता वाढली आहे.