अमेरिकेतील नासा ही अंतराळ संशोधन करणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. अंतराळाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संशोधक या संस्थेशी जोडले गेले आहेत. नुकताच नासाने भारतीय वंशाची इंटर्न प्रतिमा रॉय हीचा हिंदू देवी-देवतांसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोनंतर सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. ट्विटरवर दोन विचारांचे यूजर्स वेगवेगळ्या गटात विभागले गेला आहेत. काही जण या फोटोचं कौतुक करत आहेत. तर काही जण संशोधन करणारी संस्थाच असं करत असेल तर काय बोलवं? अशी टीका करत आहे. नासाने इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी हा फोटो ट्वीट केला आहे. त्यात प्रतिमा रॉय या इंटर्नचा फोटो आहे.

नासाने शेअर केलेल्या फोटोता प्रतिमा रॉय हीच्या टेबल आणि भिंतीवर हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आणि फोटो दिसत आहेत. या फोटोत सरस्वती, दुर्गा, राम-सीता यांचे फोटो आहेत. तर एक शिवलिंग ठेवलं आहे. तसेच लॅपटॉपवर नासाचा लोगो दिसत आहे. त्याचबरोबर प्रतिमाच्या कपड्यावरही नासाचा लोगो आहे. नासाने चार इंटर्नसचा फोटो शेअर करत इंटर्नशिपबद्दल माहिती दिली आहे. नासाच्या या पोस्टला हजारो लोकांनी लाइक करत रिट्वीट केलं आहे.

भारतीय वंशाची प्रतिमा आणि तिची बहीण पूजा राय नासाच्या ग्लेन रिसर्च सेंटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर को-ऑफ इंटर्न आहेत. दोघांनी न्यूयॉर्क सिटी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीतून शिक्षण पूर्ण केलं आहे. यात नासाने एका ब्लॉगमध्ये दोघींना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारलं आहे. तेव्हा प्रतिमाने देवावर दृढ श्रद्धा असल्याचं सांगितलं. पूजा २०२० या वर्षाच्या सुरूवातीपासून रिसर्च सेंटरमध्ये इंटर्नशिप करत आहे. नासाच्या मून टू मार्स मिशन आणि अर्टेमिस प्रोग्रामसाठी आवश्यक प्रोजेक्टसाठी ती काम करत आहे. तर प्रतिमा कम्प्यूटर इंजिनिअर टेक्नॉलॉजीत मेजर करत आहे.