News Flash

नासा चंद्रावर फुलवणार भाजीपाल्याचा मळा!

अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था चंद्रावर विविध भाजीपाल्यांच्या बीया पाठविण्याचे नियोजन करत असून, २०१५ पर्यंत चंद्रावर भाजीपाल्याचा मळा फुलविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

| December 3, 2013 02:58 am

अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था चंद्रावर विविध भाजीपाल्यांच्या बीया पाठविण्याचे नियोजन करत असून, २०१५ पर्यंत चंद्रावर भाजीपाल्याचा मळा फुलविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
ब्रिटनमधील एका संकेतस्थळाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. चंद्रावर भाजीपाला फुलविण्यावर नासातील वैज्ञानिक संशोधन करत आहेत. पृथ्वीवरून चंद्रावर बिया पाठवून तेथील पाणी असलेल्या ठिकाणी भाजीपाल्यांची शेती करण्याचा प्रयोग नासा करुन पाहणार आहे. पंरुतु, तेथील हवामान शेतीसाठी कितपत उपयोगी ठरु शकेल यावर अजूनही शंकाच आहे.
त्याचबरोबर नासाकडून चंद्रावर एक रोपटेही पाठविण्यात येणार आहे. चंद्रावर हे रोपटे जिवंत राहीले तर पुढील संशोधनाला मदत होईल असे नासातील प्रवक्त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 2:58 am

Web Title: nasa to build vegetable garden on moon by 2015
टॅग : Nasa
Next Stories
1 अॅसिड विक्रीबाबत धोरण निश्चित करावे; सर्वोच्च न्यायालयाचे राज्यसरकारांना निर्देश
2 अल्पवयीन की सराईत गुन्हेगार?
3 राष्ट्रीय सल्लागार परिषदेपुढे मंत्रिमंडळ ‘शॅडो कॅबिनेट’
Just Now!
X