News Flash

‘यांत्रिक बाहू’ बनवण्यासाठी नासाचा प्रकल्प

अवकाशातील कुठलीही वस्तू हा बाहू पकडू शकेल, त्यात उपग्रहही पकडता येतील,

खासगी कंपनीशी सहकार्य
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे ‘नासा’ या अमेरिकी संस्थेने स्टार ट्रेक चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अवकाशात काम करू शकणारा विद्युतचुंबकीय शक्तीवर चालणारा यांत्रिक बाहू तयार करण्याच्या प्रकल्पात एका अमेरिकी कंपनीशी सहकार्य करण्याचे ठरवले आहे.
अवकाशातील कुठलीही वस्तू हा बाहू पकडू शकेल, त्यात उपग्रहही पकडता येतील, उपग्रह किंवा अवकाश कचरा चक्क उचलून दूर करण्याचा मार्गही त्यात उपलब्ध असेल. नासाने त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅर्क्‍स पॅक्स कंपनीशी करार केला असून त्या अंतर्गत ‘बॅक टू फ्युचर’ चित्रपटातील मार्टी मॅकफ्लायच्या तरंगणारा स्केटिंगबोर्ड तयार केला जाईल. त्यात विद्युतचुंबकीय शक्तीचा वापर केला जाणार आहे. यात हेंडो ओव्हरबोर्ड वापरला असून त्यावर काही इंजिनांच्या मदतीने विरूद्ध बाजूने चुंबकीय क्षेत्र खालून लावले जाते, त्यामुळे तो बोर्ड उंच उचलला जातो.
त्या प्रमाणे आता नवीन यांत्रिक बाहूत म्हणजे मॅग्नेटिक टेथरिंग डिव्हाइसमध्ये क्युबसॅटसारखे लहान उपग्रह पकडता येतील, ते एका रांगेत लावता येतील त्यांची माहिती गोळा करण्याची क्षमता वाढवता येईल, याबाबत आम्ही आशावादी असून सर्व शक्यता तपासल्या जातील, असे नासाच्या व्हर्जिनियातील लँगले रीसर्च सेंटरचे ल्युक मर्चिसन यांनी म्हटले आहे. आमचे सहकार्य अर्क्‍स पॅक्स कंपनीशी राहील असे कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग हेंडरसन यांनी म्हटले आहे. नासासारख्या नामवंत संस्थेच्या बुद्धिमान वैज्ञानिक व अभियंत्यांबरोबर काम करण्यात आम्हाला आनंदच आहे असे त्यांनी सांगितले.

बॅक टू द फ्युचर
माजी आरेखक हेंडरसन यांनी १९८० मधील ” बॅक टू द फ्युचर ” या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हवेत तरंगणारा हॉवर बोर्ड तयार केला होता. त्याला हेंडो हॉवरबोर्ड असे म्हणतात, त्यात हॉवर इंजिनचा वापर केला होता. या इंजिनांमधून चुंबकीय क्षेत्र एकमेकांना दूर ढकलेल अशा पद्धतीने वापरले जाते. त्यात खाली धातूचा दांडा वापरलेला असतो. एक प्रकारे हा विद्युतचुंबकीय शक्तीवर चालणारा यांत्रिक बाहूच असतो. भूकंपरोधक इमारतींची रचना करीत असताना हेंडरसन यांना ही कल्पना सुचली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 1:16 am

Web Title: nasas new horizons spacecraft begins intensive data downlink phase
टॅग : Nasa
Next Stories
1 सतत बावीस दिवस ऑनलाइन गेम खेळणाऱ्या किशोरवयीन मुलाचा मृत्यू ; रशियातील घटना
2 एफटीआयआय आंदोलनात हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ; जनहित याचिका फेटाळली
3 पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; १ ठार, चार जखमी
Just Now!
X