03 March 2021

News Flash

नासाची ऐतिहासिक झेप! ‘पर्सिव्हियरन्स रोव्हर’चे मंगळावर यशस्वी लँडिंग

जीवसृष्टीच्या शोध मोहिमेतील महत्त्वाचं पाऊल

नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरने पाठवलेले मंगळाच्या भूपृष्ठाचे पहिले छायाचित्र. (छायाचित्र/नासा)

मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही?, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतील अंतराळ संस्था ‘नासा’ने (National Aeronautics and Space Administrations) हाती घेतलेल्या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. १८ फेब्रवारी रोजी पहाटे २.३० वाजता नासाच्या पर्सिव्हियरन्स रोव्हरचं मंगळावर यशस्वी लँडिंग करण्यात आलं. जेजेरो क्रेटर (Jezero Crater) या मंगळावरील दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आलं आहे.

मंगळावरील जीवसृष्टीच्या पाऊलखूणा शोधण्यासाठी पृथ्वीवरून पाठवण्यात आलेल्या पर्सिव्हियरन्स रोव्हरनं यशस्वीपणे पाऊल टाकलं. नासाने सात महिन्यांपूर्वी मंगळावर पर्सिव्हियरन्स रोव्हर पाठवला होता. १८ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजता रोव्हरचं यशस्वीपणे लँडिंग करण्यात आलं. या रोव्हरच्या लँडिंगबरोबरच अमेरिका मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे.

नासाने मंगळावर पाठवलेल्या पर्सिव्हियरन्स रोव्हरने जमिनीवर उतरताच पहिलं छायाचित्र पाठवलं असून, नासाने ट्विटरवर पोस्ट केलं आहे. मंगळवार जीवसृष्टी अस्तित्वात होती का? याचा शोध घेण्यासाठी नासानं पर्सिव्हियरन्स रोव्हर पाठवलं असून, मंगळ ग्रहावरील अत्यंत दुर्गम भाग असलेल्या जेजेरो क्रेटरमध्ये (Jezero Crater) रोव्हर उतरवण्यात आलं आहे. जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी हे रोव्हर मंगळावरील माती आणि दगडांचे नमुने घेऊन येईल.

‘पर्सिव्हियरन्स रोव्हर पुढील काही वर्ष मंगळावर राहणार आहे. या काळात जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा खुणांचा शोध रोव्हर घेणार असून, मंगळावरून नमुने घेऊन पृथ्वीवर परत येऊल. ज्यामुळे भविष्यात माणसाचा मंगळावर जाण्याचा मार्ग खुला होईल,’ असं नासानं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 7:36 am

Web Title: nasas perseverance rover makes historic mars landing sends first image bmh 90
Next Stories
1 आसामकडे दुर्लक्ष झाल्याची ऐतिहासिक चूक सुधारण्याचा सरकारचा प्रयत्न – मोदी
2 गोगोई यांच्याविरुद्धची ‘व्यापक कटाच्या’ तपासाची कार्यवाही बंद
3 मध्य प्रदेशातही पेट्रोल शंभरीपार
Just Now!
X