News Flash

युट्यूबनं व्हिडीयो फिल्टर केले म्हणून नसीम अघदामनं केला गोळीबार

आपल्याशी दुजाभाव होत असल्याचा तिचा आरोप

nasimesabz.com/ या वेबसाईटवरून साभार

अमेरिकेतल्या युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार करणाऱ्या महिलेची ओळख नसीम अघदाम असी पटली असल्याचे वृत्त एनबीसीनं दिलं आहे. नसीम 38/39 वर्षांची होती. तिनं केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले, नंतर तिनं स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. युट्यूब तिचे व्हिडीयो फिल्टर करते असा तिचा आक्षेप होता आणि आपल्याशी दुजाभाव होत असल्याचा तिचा आरोप होता. यामुळे आलेल्या विमनस्कतेतून तिनं हा हल्ला केल्याचा संशय आहे.

नसमीवंडर1 यासह तिचे काही युट्यूब चॅनेल होते. काही व्हिडीयो इंग्लिश होते तर काही पर्शियन. अटी व शर्तींचा भंग केल्याचा ठपका ठेवत तिची अकाउंट युट्यूबनं निलंबित केली आहेत. नसीमची nasimesabz.com ही साईटही असून ती इन्स्टाग्राम व फेसबुकवरही अॅक्टिव्ह होती.
सॅन ब्रुनो इथल्या युट्यूबच्या मुख्यालयात नसीम गेली आणि तिथल्या कर्मचाऱ्यांवर तिनं गोळीबार केला. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. तिघांना रुग्मालयात दाखल करण्यात आलं असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

आपल्या चॅनेलचं रीच युट्यूब जाणुनबुजून मर्यादित ठेवत असल्याचा आरोप नसीमनं केला होता. यासंदर्भात तिनं फेसबुकवर कैफियत मांडणारी पोस्चही लिहिली होती. युट्यूबमध्ये समान वाढीला संधी मिळत नाही असा आरोप तिनं केला होता. तिचे व्हिडीयो लहान मुलांना दाखवण्यायोग्य असल्याचं ठरवत गुगलनं तिच्या व्हिडीयोची रीच कमी केल्याचा तिचा आरोप होता. तिनं एका व्हिडीयोची क्लिप फेसबुकवर टाकत यात काय आक्षेपार्ह आहे असा सवाल दर्शकांना विचारलाही होता. तिच्या वडिलांनी गेल्या काही दिवसांपासून नसीम बेपत्ता होती असे सांगितले तसेच ती युट्यूबचा तिरस्कार करत होती असे सांगितले आहे.

युट्यूबचं अल्गोरिदम अन्यायी असल्याची तक्रार हजारो जण करतात, त्यांची भावना नसीमसारखीच असल्याचं काहींचं म्हणणं आहे. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही हातात बंदुक घ्यावीत आणि कुणावरही गोळीबार करावा अशी प्रतिक्रियाही उमटत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 2:57 pm

Web Title: nasim aghdam youtube firing revenge video filter
Next Stories
1 जाणून घ्या, कोण आहेत मध्य प्रदेशमध्ये राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळालेले कॉम्प्युटर बाबा
2 “पाकड्यांनो जरा भारतीयांकडून बोध घ्या” – दुबईचे लेफ्टनंट जनरल
3 पाकिस्ताननं लुडबूड करणं थांबवावं, मधुर भांडारकरने आफ्रिदीला सुनावले खडे बोल
Just Now!
X