27 October 2020

News Flash

दहशतवाद्यांनी ठार केलेल्या औरंगजेब या शहीद जवानाचा अखेरचा व्हिडिओ समोर

भारतीय सैन्यदलातील औरंगजेब या जवानाची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली, या हत्येपूर्वीचा त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथून औरंगजेब या जवानाचे दहशतवाद्यानी अपहरण करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी त्याची हत्या झाल्याचे समोर आले. त्याचा अखेरचा व्हिडिओ समोर आला आहे. औरंगजेब या जवानाला दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. त्याची चौकशी करण्यात येते आहे आणि त्याला मारहाण करण्यात येते आहे हे या व्हिडिओत दिसते आहे. या जवानाच्या कपड्यांवर माती लागल्याचेही स्पष्टपणे दिसते आहे. या व्हिडिओत औरंगजेबला दहशतवादी गेल्या काही दिवसांमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांबाबत प्रश्न विचारत आहेत.

वसीम, तल्हा, समीर आणि इतर दहशतवादी यांना कसे ठार केले? भारतीय सैन्याने काय रणनीती आखली होती? असे प्रश्न विचारले जात आहेत. या व्हिडिओत एकाही दहशतवाद्याचा चेहरा दिसत नाहीये. मात्र अत्यंत क्रूरपणे औरंगजेब या भारतीय सैन्यदलाच्या जवानाला मारहाण केली जाते आहे हे समोर आले आहे. या मारहाणीनंतर अत्यंत यातना देऊन आणि गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. हा औरंगजेब या जवानाचा अखेरचा व्हिडिओ आहे असे समजते आहे.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, हिज्बुल कमांडर समीर टायगरला मारण्यात आलेल्या कमांडो पथकाचा औरंगजेब सदस्य होता. तो ४४ राष्ट्रीय रायफल्स बटालियनमध्ये रायफलमॅन म्हणून शोपियां जिल्ह्यात तैनात होता. ईदच्या सुट्टीसाठी तो घरी जात असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण करून हत्या केली. औरंगजेब हा दहशतवाद विरोधी पथकाचा सदस्यही होता. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोडही केला आहे.

पाहा व्हिडिओ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 12:06 pm

Web Title: national army soldier aurangzeb video released by terrorist before his murder
Next Stories
1 ‘भाजपाच्या DNA मध्ये खोट आहे हे जनतेपर्यंत पोहचवा’
2 देशभरात आज रमजान ईदचा उत्साह!
3 विजय मल्ल्याला आणखी एक धक्का; १ कोटी ३१ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश
Just Now!
X