News Flash

राष्ट्रीय अपील न्यायालय स्थापन करण्याची याचिका घटनापीठाकडे वर्ग

सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर हा निकाल दिला आहे.

| July 14, 2016 12:23 am

राष्ट्रीय अपील न्यायालय स्थापन करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी घटनापीठाकडे वर्ग केली आहे. उच्च न्यायालयात येणाऱ्या प्रकरणांवर अपिलांसाठी ही व्यवस्था करताना प्रमुख शहरांत त्याचे पीठ सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर हा निकाल दिला आहे. चेन्नई, मुंबई व कोलकाता येथे राष्ट्रीय अपील न्यायालये स्थापन करण्यात यावीत व हा प्रस्ताव फेटाळणारा राज्य सरकारचा आदेश रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. फिर्याददारांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार नाकारता येणार नाही, असे सांगून केंद्र सरकारने हा प्रस्ताव नाकारला होता.

केंद्र सरकारने असे म्हटले होते, की असा निर्णय व्यवहार्य ठरणार नाही. जरी तशी राष्ट्रीय अपील न्यायालये स्थापन केली तरी दहा वर्षांनी तेथेही दाव्यांचा किंवा अपिलांचा ढीग लागेल, त्यामुळे पुन्हा पूर्वीसारखी स्थिती निर्माण होईल.

फेब्रुवारी २०१४ मध्ये व्ही. वसंतकुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात अशी याचिका दाखल केली होती, त्यात न्यायालयाने सरकारला त्यांच्या म्हणण्यावर सहा महिन्यांत उत्तर देण्यास सांगितले होते.

केंद्र सरकारने दिलेल्या उत्तरात असे अपील न्यायालय स्थापन करण्यास नकार दिला, कारण घटनेच्या १३०व्या कलमात दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यानंतर आता वसंतकुमार यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 12:23 am

Web Title: national court of appeal
Next Stories
1 कॅलिफोर्नियातील शालेय पुस्तकात हिंदुत्वाचे चुकीचे चित्रण नको
2 अखुंडजादा याचा अजून तरी तालिबानवर फारसा प्रभाव नाही
3 पाहा: मद्यपी पोलीस अधिकाऱयाचा भर रस्त्यात धिंगाणा
Just Now!
X