जेएनयूमध्ये उमटलेल्या कथित देशविरोधी सुराच्या पाश्र्वभूमीवर सर्वच ४६ केंद्रीय विद्यापीठांवर राष्ट्रध्वज फडकविण्याचा निर्णय या विद्यापीठांच्या उपकुलगुरूंच्या परिषदेत एकमताने घेण्यात आला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनीच हा प्रस्ताव मांडला होता. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशात हरदोई येथे केंद्रीय विद्यालयाच्या कोनशिला समारंभात त्यांनी फडकाविलेला तिरंगा हा उलटा असल्यावरून टीका झाली होती.
विद्यापीठांमध्ये २०७ फूट उंचीवर हा ध्वज फडकणार असून त्याचा प्रारंभ जेएनयू विद्यापीठापासूनच होणार आहे.
सरकारच्या या निर्णयावर टिप्पण्णी करताना काँग्रेसने म्हटले आहे की, केवळ झेंडा फडकाविणे ही देशभक्ती नसून राज्यघटनेवरील विश्वासातूनही ती दिसली पाहिजे.