09 August 2020

News Flash

हैदराबाद एन्काऊंटरची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल; घटनास्थळाच्या तपासाचे आदेश

एन्काऊंटर प्रकरणावर उलट-सुलट प्रतिक्रिया यायला लागल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे शुक्रवारी पहाटे पोलिसांनी एन्काऊंटर केले. या घटनेचे वृत्त सकाळपासूनच माध्यमांतून प्रसारित होत होते. त्यानंतर यावर उलट-सुलट प्रतिक्रिया यायला लागल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली. तसेच विशेष पथकाला घटनास्थळाची पाहणी करुन चौकशी अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात तपास विभागाच्या पोलीस उपमहासंचालकांच्या नेतृत्वाखील आयोगाने एक पथक तयार केले असून या पथकाला एन्काऊंटर झालेल्या घटनास्थळाला तातडीने भेट देऊन या घटनेतील तथ्य तपासण्याचे आदेश दिले आहेत.

सुरुवातीला केवळ माध्यमांमधूनच या एन्काऊंटर संदर्भातील बातम्या प्रसारित होत होत्या. त्यानंतर घटनेच्या सुमारे १० तासांनंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हैदराबाद पोलिसांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांची भुमिका स्पष्ट होत नसल्याने तत्पूर्वी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घेत संदर्भात सुओमोटो याचिका दाखल करुन घेतली. तसेच तातडीने घटनास्थळी जाऊन चौकशीचे आदेशही दिले.

दरम्यान, आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत बंदूक खेचून घेतली आणि फायरिंग करण्यास सुरुवात केल्याने स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसंच आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 4:25 pm

Web Title: national human rights commission has taken suo motu cognizance of media reports of hyderabad encounter aau 85
Next Stories
1 #HyderabadEncounter: बलात्काऱ्यांना मृत्यूदंड मिळायलाचं हवा पण….- देवेंद्र फडणवीस
2 भिंतीवर ५००-५०० च्या नोटा चिटकवून कुटुंबाने केली सामूहिक आत्महत्या
3 असं केल्याने बलात्कार थांबतील का?; ज्वाला गुट्टाचा थेट सवाल
Just Now!
X