News Flash

ISIS च्या संशयावरून ‘NIA’चे कर्नाटक, तामिळनाडूत २० ठिकाणी छापे

महत्वपूर्ण कागदपत्र हाती लागल्याची माहिती समोर

संग्रहीत

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ‘आयसिस’शी संबधाच्या संशायावरून सोमवारी सकाळी तामिळनाडू आणि कर्नाटकातील एकुण २० ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईत काही महत्वपूर्ण कागदपत्र हाती लागली असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या आधारे एनआयएला दहशतवादी कारवायांसंदर्भात माहिती हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील वर्षात ऑक्टोबरमध्ये देखील एनआयएकडून आयसिस मॉड्यूलशी संबंधीत असलेल्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी एकुण सहा ठिकाणांवर छापे मारण्यात आले होते. तेव्हा देखील दहशतवादी कारवायांसंबधीची महत्वपूर्ण कागदपत्र हस्तगत करण्यात एनआयएला यश आले होते.

देशभरात दहशत माजवण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधाराच्या जैश-ए-मोहम्मदच्या ४ दहशतवादी साथीदारांविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) १३ फेब्रुवारी रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 5:10 pm

Web Title: national investigation agency nia is conducting raids at more than 20 locations in karnataka and tamil nadu msr 87
Next Stories
1 माझ्या वडिलांच्या भारत-अमेरिका संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना यश मिळतय पण….
2 CAA : दिल्लीत हिंसाचाराचा उद्रेक; आंदोलकांच्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू
3 पृथ्वीवरची घातक शस्त्र भारताला देणार, उद्या होणार तीन अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार
Just Now!
X