News Flash

टेरर फंडिंग: एनआयएकडून हिजबुलच्या सईद शाहिद युसुफविरोधात आरोप पत्र दाखल

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सईद सलाउद्दीन याचा मुलगा सईद शाहिद युसुफ विरोधात २०११ च्या जम्मू काश्मीर टेरर फंडिग प्रकरणी आरोप

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सईद सलाउद्दीन याचा मुलगा सईद शाहिद युसुफ विरोधात २०११ च्या जम्मू काश्मीर टेरर फंडिग प्रकरणी आरोप पत्र दाखल केले आहे.

शाहिद युसुफला गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात एनआयएने अटक केली. युसुफ ४२ वर्षांचा आहे मी शेती क्षेत्रात काम करणारा आहे अशी ओळख त्याने दिली होती. मात्र प्रत्यक्षात तो टेरर फंडिंगचे काम करत होता. युसुफचा जामीन अर्ज ७ मार्चला फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. युसुफ हा हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित आहे असे तपास यंत्रणांनी म्हटले आहे.

NIA ने टेरर फंडिंग प्रकरणात २०११ मध्ये अनेक लोकांना अटक केली होती. त्यापैकी एकाचे नाव गुलाम मोहम्मद भट असे होते. त्याच्याकडे तपासयंत्रणांना २१ लाखांच्यावर रक्कम आढळली होती. ही रक्कम युसुफने दिली होती असे एनआयएचे म्हणणे आहे. युसुफ आणि भट या दोघांमधले संभाषण एनआयएला मिळाले आहे ज्यामध्ये या दोघांनी सांकेतिक शब्दात पैसे मिळण्यासाठी एकमेकांशी चर्चा केली आहे. हा सगळा पैसा काश्मीर खोऱ्यात दहशत माजवण्यासाठी वापरण्यात येणार होता असेही एनआयएने म्हटले आहे. आता याच युसुफ विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 8:46 pm

Web Title: national investigative agency nia files charge sheet against syed shahid son of hizbul mujahideen chief syed salahuddin
Next Stories
1 काँग्रेसतर्फे न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न होतो आहे-मीनाक्षी लेखी
2 प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने भररस्त्यात जाळून टाकले ५ लाख रुपये
3 ब्रिटनमधील ध्वज अवमान प्रकरणी भारताने केली कायदेशीर कारवाईची मागणी
Just Now!
X