27 February 2021

News Flash

नौदल कमांडरच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

दीड वर्षांपूर्वीच तिचे लग्न झाले होते.

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

दिल्लीत वसंतकुंज येथील राहत्या घरी नौदल कमांडरच्या पत्नीने आत्महत्या केली. दीड वर्षांपूर्वीच तिचे लग्न झाले होते. नैराश्यातून तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. मागच्या आठवडयात ही घटना घडली. या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मागच्या शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पोलिसांना नौदल अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्याचा फोन आला. मृत महिला दार उघडत नव्हती. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

त्यावेळी महिलेचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना रुममध्ये सिगारेटचे अनेक थोटूकही आढळून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 2:54 pm

Web Title: naval commander wife kills self dmp 82
Next Stories
1 बायकोबरोबर भांडण झालं, नवऱ्याने दोन्ही मुलांना फेकलं ३०० फूट खोल दरीत
2 पाकिस्ताननं काश्मिरींना भारतीय लष्काराविरूद्ध लढण्यासाठी प्रशिक्षण दिलं -मुशर्रफ
3 झारखंड विधानसभेसाठी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Just Now!
X