19 September 2020

News Flash

INS विक्रमादित्यवर आगीत नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू, भारताची सर्वात मोठी युद्धनौका

आयएनएस विक्रमादित्यवर लागलेली आग विझवताना शुक्रवारी एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. आयएनएस विक्रमादित्य ही भारताची एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे.

आयएनएस विक्रमादित्यवर लागलेली आग विझवताना शुक्रवारी एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. डी.एस.चौहान असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. ते लेफ्टनंट कमांडर होते. आयएनएस विक्रमादित्य ही भारताची एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे. आयएनएस विक्रमादित्य कर्नाटकातील कारवार बंदरात प्रवेश करत असताना ही घटना घडली. युद्ध नौकेच्या एका कक्षामध्ये ही आग भडकली होती.

आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत असताना डी.एस. चौहान यांचा मृत्यू झाला. आघाडीवर राहून त्यांनी नेतृत्व केले असे नौदलाकडून सांगण्यात आले. आग नियंत्रणात आणल्यानंतर धुरामुळे चौहान यांची शुद्ध हरपली. त्यांना तात्काळ कारवार येथील नौदलाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण तेथे त्यांचा मृत्यू झाला.

जहाजाच्या क्रू ने तात्काळ पावले उचलत आग अन्यत्र पसरु न देता नियंत्रणात आणली असे नौदलाकडून सांगण्यात आले. नौदलाने या आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारताने २.३ अब्ज डॉलर मोजून रशियाकडून ही विमानवाहू युद्धनौका विकत घेतली आहे. भारताने आपल्या गरजेनुसार या विमानवाहू युद्धनौकेमध्ये काही बदल केले आहेत. आयएएस विक्रमादित्य २८४ मीटर लांब असून ५६ मीटर उंच आहे. ४० हजार टन वजनाची भारतीय नौदलाकडील ही सर्वात मोठी युद्धनौका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 4:12 pm

Web Title: naval officer dies in fire onboard ins vikramaditya
Next Stories
1 पत्नीच्या भीतीने रघुरामांचं ‘न’राजकारण
2 मनसेचा पर्दाफाश करताना काँग्रेसला भीती का वाटते? -विनोद तावडे
3 स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही व मॉनिटरची चोरी, काँग्रेसची तक्रार
Just Now!
X