इम्रान खान यांनी आज शनिवारी पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याला भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी हजेरी लावली होती. सिद्धू काल शुक्रवारी पाकिस्तानमध्ये दाखल झाले होते.

सिद्धू यांनी सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे स्वगत गेले. पण तिथे त्यांचा पचका झाल्याचे पहायला मिळाले. झाले असे की, पाकिस्तानमधील सर्वच नेटीझन्सनी सिद्धूच्या बनावण अकाऊंटला टॅग करत आपला पोपट करून घेतला. पाकिस्तानमधील काही नेटीझन्सला त्यांची चूक लक्षात आली. मात्र काहीजणांनी आपला पोरखळपणा सुरूच ठेवला आहे. भारतारोबर पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सिद्दू सध्या चर्चेचा विषय आहेत.

पाकिस्तानमध्ये त्यांच्यावर स्तुतीसुमने पडत असली तरी भारतीय चाहते मात्र नाराज झाला आहेत. त्यातच  शपथविधी सोहळ्याच्या आधी सिद्धू यांनी पाकचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. सिद्धू यांनी लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारताविरोधात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांना सिद्धूंनी दिलेल्या आलिंगनामुळं काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सिद्धू यांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे.

दरम्यान, इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला सिद्धू यांना मानाचे स्थान देण्यात आले होते. या सोहळ्यात सिद्धू यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. सिद्धू यांना पाक व्याक्त काश्मिरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या बाजूला स्थान देण्यात आले होते.

इस्लामाबादमध्ये झालेल्या सोहळ्यात इम्रान खान यांना पंतप्रधान पदाची शपथ देण्यात आली. तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख असलेले इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत शुक्रवारी मतदान झाले. यामध्ये इम्रान खान यांना १७६ मते मिळाली.