News Flash

‘भाजपने सिद्धूकडे दुर्लक्ष केले’

भाजपच्या नेत्यांनी आपल्या सिद्धूकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे सिद्धू आता राजकारण सोडून सन्मानाची वागणूक मिळणाऱ्या आपल्या मूळ क्षेत्रात पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती नवज्योत सिंग सिद्धूच्या

| April 12, 2013 01:14 am

भाजपच्या नेत्यांनी आपल्या सिद्धूकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे सिद्धू आता राजकारण सोडून सन्मानाची वागणूक मिळणाऱ्या आपल्या मूळ क्षेत्रात पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने फेसबुकवरून दिली आहे. अमृतसरहून तीनदा खासदार असलेले आपले पती नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडे भाजपचे नेते दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप पंजाबमधील भाजपच्या आमदार असलेल्या नवज्योत कौर सिद्धू यांनी फेसबुकवरून केला आहे. सिद्धू वाहिन्यांवरील कार्यक्रमांसाठी आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जातो. मात्र हा आरोप नवज्योत कौर सिद्धू  यांनी फेटाळला आहे. मतदारसंघात कठोर मेहनत करणाऱ्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या आपल्या पतीकडे भाजपच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. अमृतसर जिल्हा कार्यकारिणी तसेच इतर निवडीदरम्यान सिद्धूला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोपही नवज्योत कौर यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 1:14 am

Web Title: navjot singh sidhu sidelined wont contest ls polls wife
टॅग : Bjp,Facebook
Next Stories
1 विचार बदला पासवर्ड बदलेल
2 ओबामा यांच्या अर्थसंकल्पात लष्करी खर्चामध्ये कपात नाही
3 अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशपदी श्रीनिवासन यांची निवड पक्की?
Just Now!
X