News Flash

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनी मंगळवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यां

काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनी मंगळवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांना यावर्षी पंजाबमधून लोकसभा निवडणूक लढवायची होती. पण त्यांना पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्या नाराज होत्या. नवज्योत कौर भाजपाच्या माजी आमदार आहेत. त्या अमृतसर पूर्वमधून आमदार होत्या. त्यांना चंदीगडमधून निवडणूक लढवायची होती.

माझा आता कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. आता फक्त मी एक समाजसेवक म्हणून कार्य करेन. त्या अकाली-भाजपा सरकारमध्ये आरोग्य मंत्री होत्या. जुलै महिन्यात नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या समर्थकांची भेट घेतली व काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांना सांगितले होते.

सिद्धूने त्यांच्या निवासस्थानी समर्थक नगरसेवकांची भेट घेतली होती. पंजाब सरकारमधून राजीनामा देत असलो तरी पक्षाचा राजीनामा देणार नाही असे सिद्धूने त्याचवेळी स्पष्ट केले होते. सिद्धू यांनी कार्यकर्त्यांना पक्षासाठी काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते असे त्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या नगरसेविका मोनिका शर्मा यांनी सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 6:10 pm

Web Title: navjot singh sidhu wife navjot kaur sidhu resigns from congress party dmp 82
Next Stories
1 तान्ह्या मुलीशी सांकेतिक भाषेत बोलतोय कर्णबधीर पिता; नेटकरी फिदा
2 विश्वासघातकी पाकिस्तानी लष्कराने शब्द मोडला
3 अ‍ॅमेझॉनला मालवाहतुकीसाठी भारतीय रेल्वेने दिली परवानगी; ग्राहकांना असा होणार फायदा
Just Now!
X