News Flash

नवज्योतसिंग सिद्धू जाणार इम्रान खान यांच्या शपधविधीला, राजकीय प्रवासाचे केले कौतूक

इम्रान खान ११ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी इम्रान यांनी आपल्या भारतीय क्रिकेट क्षेत्रातील मित्रांना वैयक्तिक निमंत्रणे पाठवली आहेत.

नवज्योतसिंग सिद्धू

पंजाब सरकारचे मंत्री आणि माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीचे आमंत्रण स्विकारले आहे. दरम्यान, त्यांनी पाकिस्तानचे माजी क्रिकेटर असलेल्या खान यांच्या कामगिरीचे कौतुकही करीत त्यांच्या पंतप्रधान होण्याने भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारतील असे म्हटले आहे.


इम्रान खान ११ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी इम्रान यांनी आपल्या भारतीय क्रिकेट क्षेत्रातील मित्रांना वैयक्तिक निमंत्रणे पाठवली आहेत. यामध्ये १९८३ मधील विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडू कर्णधार कपिल देव, महान फलंदाज सुनील गावस्कर आणि सिद्धू यांचा समावेश आहे.

दरम्यान, सिद्धू यांनी इम्रान यांना मोठे नेते संबोधत म्हटले की, अनेक अडचणींवर मात करीत ते इथवर पोहोचले आहेत. ते म्हणाले, प्रत्येक व्यक्तीचा एक विचार असतो, वागण्याची पद्धत असते. इम्रान यांनी आपल्या कमजोरींना मजबूतीत बदलले आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे निमंत्रण मोठ्या सन्मानाची बाब असून हे वैयक्तिक निमंत्रण आहे.

इम्रान खान यांना मी अनेक काळापासून ओळखतो. अनेक धोक्यांचा सामना करीत ते इथपर्यंत पोहोचले आहेत. राजकारणात मोठे लोक हताश होऊन काढता पाय घेतात. मात्र, इम्रान यांनी व्यवस्थेशी लढा दिला. त्यामुळे त्यांच्याजवळ व्यवस्था बदलण्याची ताकद आहे. आम्ही दोघांनी एकत्र क्रिकेट खेळलो आहोत. राजकारणामुळे लोकांचे जीवन बदलण्याची ताकद मिळते. जर राजकारणाला आपण केवळ व्यवसाय नव्हे तर मिशन मानले पाहिजे तरच तु्म्ही इतिहास लिहू शकता.

लाहोरला जाणे मी भारत-पाकिस्तानमधील शांततेच्या प्रक्रियेतील एक संधी समजतो. त्यामुळे अमृतसरपासून लाहोरपर्यंतचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असेही सिद्धू यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 1:23 pm

Web Title: navjot singh sidhu will go to imran khans swearing ceremony as pakistans prime minister
Next Stories
1 बलात्कार पीडित लहान मुलांचे कशाही स्वरुपातील फोटो दाखवू नये: सुप्रीम कोर्ट
2 कलबुर्गींप्रमाणेच गौरी लंकेश यांच्या डोक्यात गोळ्या घालण्याचे दिले होते आदेश
3 सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले: राहुल गांधी
Just Now!
X