04 December 2020

News Flash

भारतीय नौदलाने चिनी जहाजाला लावलं हुसकावून

पोर्ट ब्लेअरजवळील भारताच्या सागरी हद्दीत विनापरवानगी शिरलेल्या एका चिनी जहाजाला भारतीय नौदलाने हुसकावून लावले.

पोर्ट ब्लेअरजवळील भारताच्या सागरी हद्दीत विनापरवानगी शिरलेल्या एका चिनी जहाजाला भारतीय नौदलाने हुसकावून लावले. अंदमान-निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअरजवळ शी यान १ या चिनी जहाजाचे संशोधन कार्य सुरु होते. भारतीय नौदलाच्या टेहळणी विमानांनी हे चिनी जहाज शोधून काढले अशी माहिती सूत्रांनी एएनआयने दिली.

भारतीच नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा चीनकडून या जहाजाचा वापर होऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले. भारताच्या आर्थिक क्षेत्रात या जहाजाचे संशोधन कार्य सुरु असल्याचे समजल्यानंतर भारतीय नौदलाकडून या जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी युद्धनौका पाठवण्यात आली. कायद्यानुसार कुठल्याही दुसऱ्या देशाला भारताच्या सागरी आर्थिक क्षेत्रामध्ये शोधकार्य करण्याची परवानगी नाही.

नौदलाच्या युद्धनौकेने या जहाजाला भारतीय सागरी हद्दीबाहेर जाण्यास सांगितले. नौदलाच्या इशाऱ्यानंतर शी यान १ भारतीय सागरी हद्दीतून बाहेर पडले. पुन्हा हे जहाज चीनच्या दिशेने गेले असावे अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. हिंद महासागरातील चीनच्या हालचालींवर भारतीय नौदलाचे बारीक लक्ष आहे. अलीकडे भारतीय नौदलाच्या पी-८आय टेहळणी विमानाने हिंद महासागराच्या आसपास चिनी नौदलाच्या सात युद्धनौकांच्या हालचाली टिपल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 2:20 pm

Web Title: navy drives away suspicious chinese vessel from indian waters dmp 82
Next Stories
1 “निर्बल तर तुम्ही आहात, एकाच परिवारातील महिलेसाठी उभे आहात”
2 बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत भाजपा नेत्याने शिवसेनेला डिवचलं
3 HDFC चे कोट्यवधी खातेधारक वैतागले, सलग दुसऱ्या दिवशी महत्त्वाच्या सेवा ‘डाऊन’
Just Now!
X