करोना व्हायरसमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू’ लाँच केले आहे. या ऑपरेशनतंर्गत भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाची ‘आयएनएस जलाश्व’ ही युद्धनौका मालदीवमध्ये पोहोचली आहे. मालदीवची राजधानी मालेमध्ये ही युद्धनौका दाखल झाली आहे.
आयएनएस जलाश्व बरोबर आयएनएस मगर ही युद्धनौका सुद्धा या मिशनमध्ये असणार आहे. पहिल्या टप्प्याच्या ऑपरेशनमध्ये मालदीवमधून १ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. मालदीवमधून भारतात येताना नागरिकांना COVID-19 संबंधित सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे लागेल.
मायदेशी परतणाऱ्या भारतीयांना प्रवासादरम्यान बेसिक आणि वैद्यकीय सुविधा देण्यात येतील. ‘COVID-19 शी संबंधित आव्हानांमुळे नागरिकांना कठोर नियमांचे पालन करावे लागेल’ असे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले. मालदीवहून निघाल्यानंतर या युद्धनौका केरळ कोचीमध्ये येतील. सर्व प्रवाशांना तिथेच उतरवण्यात येईल. त्यानंतर संबंधित राज्यांकडे सुपूर्द केले जाईल.
#WATCH INS Jalashwa entering Male port for the first phase under Operation Samudra Setu to repatriate Indians from Maldives: High Commission of India in Maldives. #COVID19 pic.twitter.com/qoNPB9pioZ
— ANI (@ANI) May 7, 2020
परराष्ट्र, संरक्षण, गृह, आरोग्य आणि अन्य मंत्रालयांशी समन्वय राखून ऑपरेशन समुद्र सेतू सुरु असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. भारताने आयएनएस शार्दुल ही युद्धनौका संयुक्त अरब अमिरातीला पाठवली आहे. याशिवाय १२ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 7, 2020 2:09 pm