22 September 2020

News Flash

पनामा पेपर्स चौकशीबाबत नवाझ शरीफ -लष्करप्रमुख चर्चेची दृक्श्राव्य व्हिडीओ फीत फुटली

आपल्याला वैद्यकीय तपासणीसाठी तारीख देण्यात आली असल्याचे नवाझ शरीफ सांगताना दिसत आहेत.

| May 13, 2016 01:50 am

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ (संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि लष्करप्रमुख जन. राहील शरीफ यांच्यातील चर्चेची अत्यंत दुर्मीळ दृक्श्राव्य व्हिडीओ फीत प्रसारित झाली आहे. पनामा पेपर्सबाबतची चौकशी तातडीने पूर्ण करण्यासाठी राहील शरीफ हे नवाझ शरीफ यांच्यावर दबाव टाकत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
त्याचप्रमाणे मंगळवारी झालेल्या
या चर्चेच्या फुटेजमध्ये नवाझ शरीफ आणि राहील शरीफ हे नवाझ शरीफ यांनी अलीकडेच लंडनला वैद्यकीय तपासणीसाठी दिलेल्या भेटीबाबत चर्चा करीत असल्याचे दिसत आहे.
आपल्याला वैद्यकीय तपासणीसाठी तारीख देण्यात आली असल्याचे नवाझ शरीफ सांगताना दिसत आहेत. त्या वेळी पंतप्रधानांनी त्यापूर्वीच लंडनला पोहोचले पाहिजे, असे राहील शरीफ सांगताना दिसत आहेत. पनामा पेपर्सबाबतची चौकशी तातडीने पूर्ण केली पाहिजे असे राहील शरीफ हे नवाझ शरीफ यांना त्याच चर्चेच्या
वेळी सांगत असल्याचेही दिसून येत आहे.
दोघांमध्ये अशा प्रकारची चर्चा झाल्याच्या वृत्ताचे सरकारने जोरदार खंडन केले आहे. केवळ दोघांमध्येच झालेल्या चर्चेत नेमके काय बोलणे झाले हे जाणणे अशक्य आहे, असे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 1:50 am

Web Title: nawaz sharif panama papers
Next Stories
1 ‘कॉम्बिफ्लाम’च्या ४ बॅचेस भारतातून परत
2 गोमांस, मद्यबंदीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम
3 महाभियोगाला सामोरे जाण्यासाठी अध्यक्ष दिलमा रूसेफ निलंबित
Just Now!
X