News Flash

नवाझ शरीफ यांना ह्दयविकाराचा झटका

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना ह्दयविकाराचा झटका आला आहे.

नवाज शरीफ

लाहोरच्या सर्व्हिस रुग्णालयात दाखल असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना ह्दयविकाराचा झटका आला आहे. शनिवारी दुपारी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली. वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार हामीद मीर यांनी सुद्धा टि्वट करुन याबद्दल माहिती दिली.

रक्तातले प्लेटलेट कमी झाल्यामुळे नवाझ शरीफ यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांची प्रकृती ढासळत आहे असे जिओ न्यूजने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ट्रान्सफ्युजन नंतर शरीफ यांच्या शरीरातील प्लेटलेटस पुन्हा सामान्य झाले होते. पण पुन्हा त्यामध्ये घट झाली.

त्यानंतर पुन्हा ट्रान्सफ्युजनद्वारे शरीरात प्लेटलेटस भरण्यात आले असे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. शुक्रवारी लाहोर उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणांच्या आधारावर चौधरी साखर मिल कारखाना प्रकरणात नवाझ शरीफ यांना जामीन मंजूर केला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 5:28 pm

Web Title: nawaz sharif suffers heart attack in lahore hospital dmp 82
Next Stories
1 ‘स्विगी मॅन’ मुस्लिम असल्याने जेवण न स्वीकारणाऱ्या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल
2 हरयाणात भाजपा सरकार, मनोहर लाल खट्टर रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
3 मोदींच्या गुजरातमध्येही काँग्रेस सोडून भाजपा गेलेल्या दोन मोठ्या नेत्यांचा झाला पराभव
Just Now!
X