परदेशात असलेली संपत्ती मायदेशी परत आणली जावी या मागणीसाठी पाकिस्तानी न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असून त्या प्रकरणी पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान नवाझ शरीफ आणि माजी अध्यक्ष असफ अली झरदारी यांच्यासह ६४ नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतापाठोपाठ पाकिस्तानातही काळ्या पैशांचा मुद्दाच ऐरणीवर आल्याचे चित्र आहे. देशातील ६४ राजकीय नेत्यांनी किमान ३०० अब्ज डॉलर इतकी संपत्ती परदेशात दडवून ठेवली आहे. पैशांच्या अवैध हस्तांतरण पद्धतीने हा पैसा परदेशात धाडण्यात आला आहे. हा पैसा परत आणला जावा, अशी मागणी करणारी याचिका जावेद इक्बाल जाफरी या वकिलांनी लाहोर उच्च न्यायालयात दाखल केली होती.