छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्य़ात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या गोळीबारानंतर पाच सशस्त्र नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या घटनेची माहिती पोलिसांनी दिली.
रघुनाथनगर पोलीस स्थानक परिसरात नक्षलवाद्यांच्या गटाने स्थानिक पोलिसांच्या तुकडीवर हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनाही गोळीबार करावा लागला, अशी माहिती पोलीस अधीक्षक सदानंद कुमार यांनी दिली. गस्तीवर असताना १० नक्षलवाद्यांनी सोनहाट गावाजवळ हा हल्ला केला. पाच नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्यात आले, तर पाच जण पळून जाण्यात यशस्वी ठरले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 7, 2015 2:32 am