नक्षल चळवळीतील सुधाकरन आणि त्याची पत्नी नीलिमा यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकरन याच्यावर 1 कोटी आणि त्यांचे पत्नी नीलिमा हिच्यावर 25 लाख रुपयांचे बक्षिस होते तेलंगाना पोलिसांसमोर त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. जरी तेलंगाना पोलिसांनी औपचारिक घोषणा केली नाही. पण झारखंड पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की नक्षलवाद्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी केवळ काही दिवसा पूर्वी तेलंगाना पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

सुधाकरण कोण आहे?
सुधाकरन, माओवादी केंद्रीय समितीचे सदस्य, ओगु, सतवाजी, बुरायार, सुधाकर आणि किरण या इतर नावांनी ओळखले जातात. झारखंडमध्ये, या नक्षलवाद्यांनी तेंदूपत्ता ठेकेदारांकडून आणि कंत्राटदाराकडून खंडणीगोळा करून मोठी मालमत्ता जमविली आहे आणि आपला मित्र सत्यनारायणच्या माध्यमातून त्याने या पैशांना व्यवसायात गुंतवून ठेवले आहे. नक्षलवादी नेते अरविंदजी यांच्या मृत्यूनंतर झारखंड आणि छत्तीसगढ येथील नक्षलवादी संघटना या नेतृत्वाखाली कार्यरत होते