News Flash

जवानाच्या मृतदेहात नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरली

झारखंडमधील लातेहार जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानाच्या मृतदेहात नक्षलवाद्यांनी, शस्त्रक्रिया करून स्फोटके (आयईडी) ठेवल्याचे उघड झाले आहे.

| January 11, 2013 04:54 am

झारखंडमधील लातेहार जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानाच्या मृतदेहात नक्षलवाद्यांनी, शस्त्रक्रिया करून स्फोटके (आयईडी) ठेवल्याचे उघड झाले आहे.
रांची येथील शासकीय रुग्णालयात जवानाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूच्या निदर्शनास ही बाब आली. शहीद जवानाच्या पोटांत दीड किलो वजनाची स्फोटके टाके घालून दडविण्यात आली असल्याचे त्यांना आढळले.
‘अँबुश’ (अतिरेक्यांना कोंडीत पकडून ठार मारण्याची लष्करी कारवाई) झाले त्या ठिकाणीच २९ वर्षीय बाबुलाल पटेल यांचा मृतदेह पडला होता. त्याचे शवविच्छेदन गुरुवारी सकाळी होणे अपेक्षित होते. मात्र डॉक्टरांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने मृतदेहाची पाहणी कारावी असे सुचविले.
या पाहणीत शरीरात स्फोटके दडविल्याचे स्पष्ट झाले. ही स्फोटके त्यांच्यावर थोडासासुद्धा भार पडला तर फुटू शकणारी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
७ जानेवारी रोजी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे ९ जवान, झारखंडच्या नक्षलवादविरोधी पथकातील १ आणि चार नागरिक ठार झाले, तर ९ नक्षलवादीही या चकमकीत मारले गेले असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 4:54 am

Web Title: naxlite kept explosive in soldiers dead body
टॅग : Naxalite
Next Stories
1 बलात्कार प्रकरण वेगाने सोडविण्यात राजस्थानचा आदर्श
2 लक्षावधी डॉलर्स गुप्त खात्यात दडविल्याची भारतीय-अमेरिकी उद्योजकाची कबुली
3 पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात शीख व्यक्तीचा शिरच्छेद
Just Now!
X