गाझियाबादच्या सादारपूर गावाजवळ असणाऱ्या पूर्व पेरीफेरल एक्स्प्रेस वे वर गुरुवारी एनसीसीच्या छोटया प्रशिक्षण विमानाने इमर्जन्सी लँडिंग केले. विमान उड्डाणवस्थेत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे आपातकालीन लँडिंग करावे लागले.

विमानाच्या शेपटाकडील भागावर असणाऱ्या लोगोवरुन ते विमान नॅशनल कॅडेट कॉर्प्स म्हणजे एनसीसीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या इमर्जन्सी लँडिंगमध्ये विमानाच्या एकाबाजूच्या पंखाचे नुकसान झाले आहे.

एअर फोर्सच्या विमानांना एक्सप्रेस वे वर लँडिंगचा अनुभव
युद्ध, आपत्तीच्या काळात अपवादात्मक परिस्थितीत फायटर विमानांना धावपट्टीऐवजी हायवे वर सुद्धा लँडिंग करावे लागू शकते. अशा प्रसंगाची तयारी असावी म्हणून इंडियन एअर फोर्सने यापूर्वी एक्सप्रेस वे वर फायटर विमानांच्या लँडिंगचा सराव केला आहे.