News Flash

गृहमंत्र्यांची राष्ट्रवादीकडून पाठराखण

आज-उद्या घटक पक्षांची बठक

आज-उद्या घटक पक्षांची बठक

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या ”आरोप”पत्राचे तीव्र पडसाद रविवारी दिवसभर दिल्लीतही उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बठकींचे सत्र सुरू होते. पक्षनेत्यांच्या रात्री झालेल्या बठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करत असल्याचे स्पष्ट झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते तसेच, मुख्यमंत्र्यांशी उद्या, सोमवारी चर्चा करणार आहोत. गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील, असे शरद पवार यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानुसार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांची सोमवारी व मंगळवारी बठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बठकीनंतर पत्रकारांना दिली. मात्र, पुरावे मिळाल्याशिवाय गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात शरद पवार यांचाही उल्लेख असल्याने व गृहमंत्र्यांच्या कारभाराबाबत पवारांना माहिती दिल्याचा दावा पत्रात केल्याने पवार यांच्याकडून पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, राज्यात घोंघावणाऱ्या राजकीय वादळावर चर्चा करण्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्लीत बोलावून घेतले. दोघेही रविवारी संध्याकाळी दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी येऊन दाखल झाले. या बठकीत पवार यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे आदी नेते होते. अंबानी धमकी प्रकरणासाऱ्ख्या महत्त्वाच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न केला जात आहे. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) तसेच, राष्ट्रीय तपास यंत्रणा ”एनआयए’च्याोपासात सत्याचा उलगडा होईल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

कमलनाथ यांचीही उपस्थिती

राज्यातील घडामोडींबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वालाही शरद पवार यांनी विश्वासात घेतले होते. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या बठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हेही उपस्थित होते. बठकीपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही पवारांशी चर्चा केली.

सरकार स्थिरच-पवार

या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गांभीर्याने हाताळणी करत आहेत. विरोधीपक्ष नेत्यांकडून राज्यातील सरकारवर आरोप केले जात असले आणि सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असले तरी, महाविकास आघाडीला सरकारच्या स्थर्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा पुनरूच्चार पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी दिल्लीत येऊन पवारांशी दोन तास चर्चा केल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचीही चर्चा तीव्र बनली होती. त्यातच शनिवारी परमबीर यांनी पत्र लिहून देशमुख यांच्यावर थेट आरोप केल्यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसही अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आरोपांना प्रत्युत्तर दिले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती पवार यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 2:17 am

Web Title: ncp back maharashtra home minister anil deshmukh zws 70
Next Stories
1 बटाटय़ाचे दर निम्म्यावर; उत्पादनखर्चही निघेना
2 गोळीबारात ८ आशियाई व्यक्तींचा मृत्यू; अमेरिकेत निषेध मोर्चे
3 ममतांना पराभव दिसू लागला – मोदी
Just Now!
X