माजी केंद्रीय मंत्री एन.डी. तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने रोहित शेखर यांची पत्नी अपूर्वाला अटक केली आहे. फॉरेन्सिक तपासणीतील पुराव्यांच्या ही कारवाई करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शेखर हे दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत राहत होते. रोहित यांचा १६ एप्रिलरोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. रोहित शेखर तिवारी यांचा गळा दाबल्याने किंवा उशीने तोंड दाबल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी अखेर रोहित शेखर यांची पत्नी अपूर्वाला अटक केली आहे. अपूर्वा यांची तब्बल तीन दिवस चौकशी देखील करण्यात आली.

अपूर्वाने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी घरी कोणीही नव्हते. यादरम्यान, पती- पत्नीमध्ये भांडण झाले आणि अपूर्वाने संतापाच्या भरात गळा दाबून पतीची हत्या केली, असे समजते.

आईनेही व्यक्त केला होता संशय
रोहितचे पत्नीशी संबंध सौहार्दाचे नव्हते. तो त्याची राजकीय कारकीर्द सुरू होत नसल्याबाबत निराश होता, असे रोहित शेखर यांच्या मातोश्री उज्ज्वला यांनी सांगितले होते.  २०१८ मध्ये शेखर व अपूर्वा यांचा प्रेम विवाह झाला होता. विवाहाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्यात कुरबुरी होत्या, असेही त्यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nd tiwari son rohit shekhar death case wife apoorva arrested murder charges
First published on: 24-04-2019 at 11:38 IST