News Flash

उद्या निवडणुका झाल्यास एनडीए गमावणार 99 जागा, इंडिया टुडेचा सर्व्हे

या जनमत चाचणीत 13 हजारांपेक्षा जास्त लोकांना प्रश्न विचारण्यात आले

देशात उद्या निवडणुका झाल्यास भाजपाप्रणित एनडीएला 99 जागांचा फटका बसेल असा अंदाज इंडिया टुडे आणि कार्वे यांच्या सर्व्हेने व्यक्त केला आहे. उद्या निवडणुका झाल्यास एनडीएला 237 जागा मिळतील या जागा 2014 लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत 99 ने कमी आहेत. तर यूपीएला 166 जागा मिळतील. यूपीएच्या जागा 106 ने वाढतील असे ही जनमत चाचणी सांगते आहे.

लोकसभा निवडणुकांचे रणमैदान जवळ आले आहे. सगळ्याच पक्षांनी या निवडणुकांसाठी कसून तयारी केली आहे. असं असताना इंडिया टुडे आणि कार्वे यांनी एक जनमत चाचणी घेतली. या जनमत चाचणीत 13 हजारांपेक्षा जास्त लोकांची मतं नोंदवण्यात आली. उद्या निवडणुका झाल्या तर काय होईल? असा प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर मिळालेल्या उत्तरांवरून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एनडीएने मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये 270 पेक्षा जास्त जागा मिळवत एकहाती सत्ता काबीज केली होती. मात्र उद्या देशाच्या निवडणुका झाल्या तर याच एनडीएला 99 जागा कमी पडतील असे हा सर्व्हे सांगतो आहे. तर यूपीएच्या जागा वाढतील आणि इतर पक्षांनाही 140 जागा मिळतील असेही ही जनमत चाचणी सांगते आहे.

लोकसभा निवडणुका अद्याप जाहीर होणे बाकी आहे. मात्र देशाचा मूड काय आहे हे या जनमत चाचणीतून जाणून घेण्यात आले. सध्याचा विचार करता देशाचा मूड मोदींच्या आणि पर्यायाने भाजपाच्या बाजूने स्पष्ट बहुमत मिळेल असा नाही असेच दिसते आहे. आता लोकसभा निवडणुकांमध्ये काय होणार? भाजपाकडून काय काय आश्वासने दिली जाणार हे सगळे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही लढाईही नमोVs रागा अशीच आहे. मात्र जनता कोणाला कौल देणार यावर देशाची सत्ता कोणाकडे येणार ते ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 8:28 pm

Web Title: nda wolud lose 99 seats if elections held today says india todays survey
Next Stories
1 ममता, मायावती, अखिलेश आणि राहुल गांधी एकत्र आल्यास मोदींची हार, इंडिया टुडेचा सर्व्हे
2 ‘राहुल गांधींनी आपण एकटे राजकारण करु शकत नाही मान्य केलं आहे’
3 वडील व्यवसायाने टेलर, मुलगा सीए परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात टॉपर
Just Now!
X