पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी कोची मेट्रोचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना आपण कोची मेट्रो देशाला अर्पण करत असल्याचे सांगितले. गेल्या तीन वर्षात आमच्या सरकारने देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याचे मोदींनी यावेळी म्हटले. कोची मेट्रो रेल लिमिटेडमध्ये केंद्र आणि राज्य सरकारची प्रत्येकी ५० टक्के भागीदारी आहे. कोची मेट्रोचा विस्तार २७ किमी इतका केला जाणार आहे. पहिल्या टप्पा १३.३ किमीचा असेल. उर्वरित काम दोन टप्प्यात पूर्ण होईल. मेट्रोसाठी येथे स्वतंत्र फीडर सर्व्हिसची सुविधा असेल. २०१३ मध्ये कोची मेट्रोचे काम सुरू झाले होते. ई. श्रीधरन यांनी या प्रकल्पाचे सल्लागार म्हणून काम पाहिले होते. तसेच कोची मेट्रो हे मेक इन इंडियाचे उत्तम उदाहरण असल्याचे मोदींनी म्हटले. चेन्नईतील अलस्टोमकडून कोची मेट्रोच्या डब्यांची बांधणी करण्यात आली. यामधील ७० टक्के घटक हे भारतामध्येच तयार झाल्याचे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते कोची मेट्रोचे उद्घाटन; ई.श्रीधरन, व्यंकय्या नायडूही सोहळ्याला उपस्थित

Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
chhagan bhujbal, armstrong company
भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जिल्हा बँकेकडून २६ कोटींचा लाभ, थकीत कर्जफेडीसाठी ‘ओटीएस’ योजनेत सहभाग
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

अनेक अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली कोची मेट्रो ही आणखी एका गोष्टीमुळे विशेष ठरणार आहे. कोची मेट्रोमुळे १००० महिला आणि २३ तृतीयपंथीयांना रोजगार मिळणार आहे. केरळ सरकारने तृतीयपंथीयांसोबत होणारा सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला होता. केरळ सरकारच्या कुडुम्बश्री योजनेतंर्गत कोची मेट्रोत २३ तृतीयपंथीयांना कामावर ठेवण्यात आले आहे. या सगळ्यांची विविध पदांवर भरती करण्यात आली असून सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यानंतर या तृतीयपंथीयांना टिकिटिंग, सफाई आणि हाऊस किपिंगसंदर्भातील कामांसाठी नियुक्त केले जाईल. यापैकी एक असलेल्या रागा रजनीने मेट्रोत काम करण्याच्या अनुभवाबद्दल म्हटले की, सुरूवातीला इतर लोक आमच्यापासून लांब राहायचे. मात्र, नंतर त्यांना आम्ही त्यांच्यासारखेच आहोत, हे जाणवल्याचे रजनीने म्हटले.