काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करताना दगडफेक करणाऱ्यांकडून स्वत:च्या बचावासाठी अनेकदा महिलांचा मानवी ढालीसारखा वापर करता येतो. त्यामुळे लष्करी कारवाईत अनेक अडथळे येतात. अशावेळी लष्करातील महिला जवानांची खूप मोठी मदत होऊ शकते. त्यामुळेच लष्करातील जवान आणि सरदार साहिबान या पदांवर लवकरच महिलांची भरती केली जाईल, अशी माहिती लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिली. ते शनिवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आम्ही अनेकदा एखादी कारवाई करायला जातो तेव्हा स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. कारवाईत अडथळा आणण्यासाठी महिलांना पुढे केले जाते. अशावेळी जवान या महिलांना हात लावायला कचरतात. याचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी महिलांचा मानवी ढालीसारखा वापर केला जातो. त्यावेळी आम्हाला पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांची गरज भासते. याच पार्श्वभूमीवर महिलांना लष्करात भरती करण्यापूर्वी त्यांना सुरूवातीला सैन्यातील पोलीस जवान पदावर काम करावे लागेल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास त्यांना लष्करात भरती करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करू, असे रावत यांनी म्हटले. लष्कराकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल आणि त्याचा सुयोग्य रीतीने वापर केल्यास कारवाईत अडथळा आणणाऱ्या स्थानिकांना फारशी दुखापत होणार नाही, असेही लष्करप्रमुखांनी म्हटले.

सैनिक तीन महिलांवर बलात्कार करु शकतात, फिलिपाइन्सच्या राष्ट्राध्यक्षांची जीभ घसरली

काही दिवसांपूर्वीच लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भारतीय सैन्यात महिलांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर संधी देणार असल्याचे संकेत दिले होते. जगभरातील फार कमी देशामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सैन्यदलात स्थान देण्यात येते. पुरुषांचे वर्चस्व असणारे हे क्षेत्र वेगाने बदलत असून सैन्याच्या पोलीस दलात महिलांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला युद्धभूमीवर यायला हव्यात, भारतीय सैन्यात लवकरच हा बदल होईल. आता सुरुवातीच्या टप्प्यात महिलांना लष्करी पोलीस म्हणून भरती करण्याचा विचार आहे. पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात महिलांना स्थान देणे हा मोठा बदल असेल असेही ते म्हणाले. सध्या सैन्यामध्ये वैद्यकीय, कायदा, शिक्षण आणि इंजिनिअरींग क्षेत्रात महिला मोठ्या प्रमाणात असतात. परंतु काही कारणांमुळे प्रत्यक्ष युद्धभूमीवर त्यांची नियुक्ती केली जात नव्हती. मात्र आता त्यांना ही संधीही दिली जाणार असल्याचे रावत यांनी म्हटले होते.

काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक करणाऱ्या तरुणीला देशासाठी खेळायचंय