News Flash

नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य मिळविणाऱ्या नीता अंबानी पहिल्या भारतीय महिला आहेत.

नीता अंबानी

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. रिओ दी जानेइरो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत नीता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य मिळविणाऱ्या नीता अंबानी या पहिल्या भारतीय महिला आहेत. जून महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यत्वासाठी नीता यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी किमान ३९ मतांची आवश्यकता असते.  ऑलिम्पिकस्पर्धेच्या पुर्वसंध्येला रिओ दी जानेइरो येथे पार पडलेल्या निवडणूकीत नीता अंबानी यांनी ७१ मते मिळवून सदस्यत्वाचा मान मिळविला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील  सदस्यत्व मिळाल्यानंतर नीता यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. भारताचा माजी क्रिकेटर आणि भारतीय ऑलिम्पिक सदिच्छादूत सचिन तेंडुलकरने ट्विटरच्या माध्यमातून अंबानी यांचे अभिनंदन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 10:10 pm

Web Title: neeta ambani selected ioc member
Next Stories
1 केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले!
2 केजरीवाल आणि आप सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका
3 GST Bill : ‘जीएसटी’चा मार्ग मोकळा!
Just Now!
X