23 November 2020

News Flash

NEET/JEE दिवाळीनंतर घ्या, स्वामींचं पंतप्रधान मोदींना साकडं

पंतप्रधानांचंं उत्तर आलं की विद्यार्थ्यांना माहिती देणार

सर्वोच्च न्यायालयानं जेईई व नीट परीक्षा घेण्याला परवानगी दिली असली, तरी परीक्षा पुढे ढकलण्याचा सूर अजूनही कायम असल्याचं दिसत आहे. जेईई व नीट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी-पालक वर्तुळातून होत असतानाच भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. स्वामी यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून मोदींना फोन करून परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.

अभियांभिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई व वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा नीट सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. १ ते ६ सप्टेंबर दरम्यान जेईई परीक्षा घेण्यात येणार असून नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे. करोनामुळे दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी-पालकांसह काही राज्यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयातही यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळत परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मावळलेली नाही.

विशेष म्हणजे भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. स्वामी यांनी काही दिवसांपूर्वीचं ट्विट करून देशातील करोना परिस्थितीचा हवाला देत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा स्वामी यांनी पंतप्रधानांच्या कानावर ही मागणी घातली आहे. स्वामी यांनी ट्विट करू याची माहिती दिली आहे.

आणखी वाचा- दिवाळीपर्यंत करोना नियंत्रणात येईल; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

“जेईई व नीट परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात याव्या, यासाठी मी सकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी फोन करून शेवटचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयीन सचिवांनी फोन करून कळवतो, असं सांगितलं आहे. जर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला, तर मी विद्यार्थ्यांना कळवीन,” असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- Coronavirus: भारताच्या नावे नकोसा जागतिक विक्रम, एका दिवसात आढळले ८०,००० बाधित

देशातील स्थिती करोनामुळे गंभीर झाल्यानं सुब्रमण्यम स्वामी हे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना याविषयी भूमिका घेण्याचं आणि पंतप्रधानांना कळवण्याचं आव्हान केलं होतं. “करोना काळात विद्यार्थ्यांना सुरक्षित व्यवस्था पुरवण्यास राज्य असमर्थ ठरत असतील, तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तसं जाहीरपणे बोलावं आणि पंतप्रधानांनी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा करावी,” असं स्वामी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 10:55 am

Web Title: neetjee subramanian swamy request pm narendra modi for postpone exam bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न होतोय; राहुल गांधींचं देशवासीयांना एकजुट होण्याचं आवाहन
2 किती ब्राह्मणांकडे बंदुकांचा परवाना आहे? UP सरकारनं मागवली माहिती अन्…
3 Coronavirus: भारताच्या नावे नकोसा जागतिक विक्रम, एका दिवसात आढळले ८०,००० बाधित
Just Now!
X