News Flash

नागरिकांच्या सुटकेसाठी ब्रिटनच्या अफगाणिस्तानशी वाटाघाटी

अफगाणिस्तान स्थित्यंतरासाठी पंतप्रधानांनी सिमॉन गास यांना खास दूत नेमले असून ते चर्चेसाठी दोहाला गेले आहेत.

नागरिकांच्या सुटकेसाठी ब्रिटनच्या अफगाणिस्तानशी वाटाघाटी

ब्रिटनने अमेरिकेबरोबरच अफगाणिस्तानातील सैन्य माघारी घेतले असले तरी तेथील ब्रिटिश नागरिकांची सुटका करण्यासाठी व पात्र अफगाणी शरणार्थींच्या सुटकेसाठी वाटाघाटी सुरू आहेत, असे डाऊ निंग स्ट्रीट कार्यालयाने म्हटले आहे. ब्रिटनचे अधिकारी हे सध्या तालिबानी नेत्यांच्या संपर्कात असून कतारमधील दोहा येथे चर्चा सुरू आहे.

ब्रिटन, पाकिस्तान, उझबेकिस्तान व ताजिकिस्तानमध्येही १५ आपत्ती प्रतिसाद तज्ज्ञ पाठवणार असून ते ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्यांना मदत करणार आहेत. तेथे अडकून पडलेल्या लोकांना तिसऱ्याच देशाच्या माध्यमातून ब्रिटनमध्ये आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. ब्रिटिश नागरिक, दुभाषे, इतर अफगाणी लोक यांनाही परत आणण्याचा विचार आहे. काही अफगाणी लोक तेथील ब्रिटिश आस्थापनात काम करीत होते.

अफगाणिस्तान स्थित्यंतरासाठी पंतप्रधानांनी सिमॉन गास यांना खास दूत नेमले असून ते चर्चेसाठी दोहाला गेले आहेत. तालिबानी प्रतिनिधींनी ब्रिटन किंवा इतरत्र जाणाऱ्या लोकांना सुरक्षितपणे जाऊ द्यावे असे त्यांचे प्रयत्न असतील. तालिबानने इतर लोकांची सुरक्षित सुटका करण्याचे वचन दिले आहे. दरम्यान, डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाने म्हटले आहे, की ऑपरेशन वॉर्म वेलकम हे ब्रिटनमध्ये येणाऱ्या अफगाणी लोकांसाठी राबवण्यात येत आहे. त्यांची आयुष्ये पुन्हा उभी करण्यासाठी मदत केली जाईल. ब्रिटनच्या लष्कराला तेथे असताना मदत करणाऱ्या अफगाणी  कुटुंबीयांना ब्रिटनमध्ये व्हिसानुसार प्रवेश दिला जाईल, असे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 12:10 am

Web Title: negotiations with britain afghanistan for the release of civilians akp 94
Next Stories
1 सरकार तालिबानला दहशतवादी संघटना मानते का? – ओमर अब्दुल्ला
2 ‘कोलेस्टेरॉल’चे प्रमाण कमी करणारे इंजेक्शन लवकरच उपलब्ध
3 भबानीपूरचे आमदार भाजपात
Just Now!
X