18 September 2020

News Flash

नेल्सन मंडेला यांची प्रकृती आणखी खालावली

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला यांची प्रकृती गुरुवारी आणखी बिघडली.

| June 27, 2013 01:12 am

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला यांची प्रकृती गुरुवारी आणखी बिघडली. गेल्या ४८ तासांमध्ये मंडेला यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते मॅक महाराज यांनी तेथील वृत्तवाहिनीला सांगितले. 
मंडेला यांची प्रकृती खालावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी आपला मोझाम्बिकचा दौरा रद्द केलाय. मंडेला तीन आठवडय़ांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती ढासळली असून दिवसेंदिवस त्यात कोणतीच सुधारणा होत नसल्याची चिन्हे आहेत. फुफ्फुसातील जंतूसंसर्गामुळे मंडेला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 1:12 am

Web Title: nelson mandelas condition worsens
Next Stories
1 हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोन जवान शहीद
2 कॉंग्रेस नेत्यांनीच केला उत्तर प्रदेशात पक्षाचा पराभव – बेनी प्रसाद वर्मा
3 लष्कराच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्यामागे लष्करे तैय्यबा
Just Now!
X