भारतीय चलनातील १०० रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या सर्व नोटांवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली आहे. नेपाळ सरकारच्या या निर्णयाचा पर्यटकांना मोठा फटका बसणार आहे. नेपाळमध्ये भारतीय चलन मोठया प्रमाणात वापरले जाते. नेपाळी नागरिक आणि व्यावसायिक रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी भारतीय चलन मोठया प्रमाणावर वापरतात. १०० रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या भारतीय नोटा जवळ बाळगू नका किंवा व्यवहारासाठी वापरु नका. १०० रुपयाच्या पुढच्या नोटांना कायदेशीर मान्यता नाही असे नेपाळचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री गोकुळ प्रसाद बासकोटा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेपाळमध्ये भारतीय चलन स्वीकारले जात असले तरी भारतात नोटाबंदी होण्याआधी सुद्धा नेपाळमध्ये ५०० आणि १ हजारच्या नोटेने व्यवहार करताना अडचणी येत होत्या. नेपाळ सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतीय पर्यटकांच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतातून मोठया संख्येने पर्यटक नेपाळमध्ये जात असतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal bans indian currency
First published on: 14-12-2018 at 20:01 IST