News Flash

२ हजाराच्या बनावट नोटांप्रकरणी ४ पाकिस्तानी आणि २ नेपाळी नागरिक अटकेत

काठमांडू विमानतळावर नेपाळ पोलिसांची कारवाई

भारतीय चलनातील २ हजार रूपयांच्या बनावट नोटांप्रकरणी नेपाळ पोलिसांनी ४ पाकिस्तानी आणि २ नेपाळी नागरिकांना अटक केली आहे. काठमांडू येथील त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या सहाजणांकडून नेपाळ पोलिसांनी २ हजार रूपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

या सहा भामट्यांडून जप्त करण्यात आलेल्या नोटा या भारतीय चलनातील २ हजाराच्या बनावट नोटा आहेत अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. आता नोटा नेमक्या या सहाजणांकडे कुठून आल्या? यामागे आणखी काही रॅकेट आहे का? याची चौकशी सध्या नेपाळ पोलीस करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 11:02 pm

Web Title: nepal police arrested 4 pakistanis and 2 nepalis in possession of fake indian currency notes
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींकडे सोपवला राजीनामा, ३० तारखेला शपथविधी?
2 पराभूत होऊनही हंसराज अहीर यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार-गडकरी
3 आम्ही हरलो तरीही पराभव मान्य नाही-नारायण राणे
Just Now!
X