सध्या भारत आणि नेपाळ सीमेवरून दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीतच बिहारमधील भारत नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. भारत नेपाळ सीमेवर असलेल्या बिहारमधील सीतामढी या गावात नेपाळकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये शेतात काम करणाऱ्या एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या घटनेनंतर सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना नारायणपूर आणि लालबन्दी सीमाभागात घडली. पिपरा परसाईन पंचायतीच्या जानकी नगर सीमेवर काही जण शेतात काम करत होते. त्याचवेळी नेपाळच्या दिशेहून अंधाधुंद गोळीबार सुरू करण्यात आला. यादरम्यान एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि दोन जण त्यात जखमी झाले आहेत. दरम्यान, दोघांना उपचारासाठी सीतामढीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच घटनास्थळी स्थानिक जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकारीही रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

Malaysia Military Helicopters Crash
मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेत भीषण धडक; १० जणांचा मृत्यू, घटनेचा व्हिडीओ समोर
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या
Samajwadi Party akhilesh yadav
मुरादाबादमध्ये सपाकडून दोन दिवसांत दोन अर्ज; रामपूरमध्ये उमेदवार जाहीर, आणखी एका दावेदाराने वाढवला तणाव

नेपाळबरोबर चर्चा का नाही?

“नेपाळचा नवीन नकाशा कायम राहणार असून त्यात काहीही बदल होणार नाही” असे नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावाली यांनी म्हटलं होतं. नेपाळने नवीन नकाशा जारी केला असून त्यात लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भारतीय प्रदेश नेपाळमध्ये दाखवले आहेत. नकाशामधील या बदलांना नेपाळच्या संसदेची मान्यता आवश्यकता आहे. त्यासाठी नेपाळच्या संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. नेपाळने लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. “नेपाळच्या नकाशामध्ये बदल करण्याला सर्वपक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा बदल कायम राहणार आहे” असं नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावाली यांनी म्हटलं होतं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला होता.