News Flash

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना धक्का; बहुमत सिद्ध करण्यात अपयश!

ओली यांच्याविरोधात १२४ मतं

नेपाळमधील के.पी. शर्मा ओली सरकारला मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान के पी शर्मा ओली संसदेच्या खालच्या सदनात बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले आहेत. २३२ पैकी १२४ मतं त्यांच्या विरोधात पडली. पंतप्रधान ओली २७५ सदस्य असलेल्या सदनात बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत. ओली यांना फक्त ९३ मतं पडली. त्यांना कमीत कमी १३६ मतांची आवश्यकता होती. विश्वासमत विरोधात १२४ मतं पडली. १५ खासदार तटस्थ होते. तर ३५ खासदार मतदानावेळी गैरहजर होते. त्यामुळे कलम १०० (३) अंतर्गत त्यांचं पंतप्रधानपद गेलं आहे.

पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टीनं ओली सरकारला दिलेलं समर्थन काढल्याने सरकार अल्पमतात आलं होतं. नेपाळ कम्युनिस्ट पार्टीने आपल्या खासदारांना व्हिप जारी करत पंतप्रधानांच्या बाजूने मतदान करण्यास सांगितलं होतं. मात्र पक्षातील नाराज खासदारांची समजूत काढण्यास ते अपयशी ठरले.

फेब्रुवारी २०१८ मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळच्या समर्थनानंतर ओली यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली होती. पंतप्रधान ओली यांच्या शिफारशीनंतर २० डिसेंबर २०२० रोजी राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी संसद विसर्जित केली होती. तसेच निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींचा निर्णय रद्द करून ओली सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या निर्णयाला काही तासातच स्थगिती

पंतप्रधान ओली यांनी भारताबाबत घेतलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात मतभेद सुरु झाले होते. भारताविरोधात घेतलेली भूमिका आणि वक्तव्यांमुळे नेपाळमधील नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता. ओली यांच्या कार्यकाळात नेपाळने जारी केलेल्या नव्या नकाशामध्ये भारत नेपाळ सीमेवरील कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश नेपाळचा भाग असल्याचे दाखवण्यात आलं होतं. तर दुसरीकडे चीनने हुमला येथे नेपाळच्या सीमेजवळचा बराच मोठा भाग बळकावला असल्याचं समोर आलं आहे. भारतात असलेली अयोध्या खरी नसून बनावट अयोध्या आहे. तसंच प्रभू रामचंद्र नेपाळी होते असा अजब दावाही नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 6:26 pm

Web Title: nepal prime minister kp sharma oli lose confidence vote in parliament rmt 84
टॅग : Nepal
Next Stories
1 “केरळ आता इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवू शकणार नाही”, मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र
2 दिल्लीतल्या करोना चाचण्या कऱणाऱ्या एका लॅबला मोठी आग, जीवितहानी टळली!
3 करोनामुळे तेलुगू अभिनेते टीएनआर यांचे निधन
Just Now!
X