04 March 2021

News Flash

चीनने बळकावला नेपाळचा भूभाग, आंदोलकांनी जाळला जिनपिंग यांचा पुतळा

नेपाळमध्ये चीन विरोधात झालेल्या निदर्शनांच्यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा पुतळा जाळण्यात आला.

नेपाळमध्ये चीन विरोधात झालेल्या निदर्शनांच्यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा पुतळा जाळण्यात आला. चीनने नेपाळच्या भूभागावर केलेल्या अतिक्रमणाविरोधात सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. सापतारी, बारदीया आणि कपिलवास्तू जिल्ह्यामध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले होते. यावेळी चीन विरोधात मोठया प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलकांकडे फलक, बॅनर्स होते. “गो बॅक चायना, नेपाळी भूमी परत करा” अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. चीनने नेपाळच्या ३६ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण केल्याचा सर्वेक्षण खात्याचा अहवाल समोर आल्यानंतर हे आंदोलन करण्यात आले. हुमला जिल्ह्यातील भगदरे नदीजवळची सहा हेक्टर, कारनळी जिल्ह्यातील चार हेक्टर जमिनीवर चीनने अतिक्रमण केले आहे. हा भाग आता तिबेटच्या फुरांगमध्ये येतो.

सिंधूपालचौक जिल्ह्यातील १० हेक्टर पेक्षा जास्त जमिनीवर चीनने अतिक्रमण केले आहे. आता हा भाग तिबेटच्या न्यालाममध्ये येतो. सर्वे डाटामध्ये अरुण खोला, कामु खोला आणि सुमजंग जवळचा काही भाग आता तिबेटमध्ये दाखवला आहे. चीनने यापूर्वी सुद्धा अन्य देशांचा भूभाग बळकवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त नेपाळबरोबरच नव्हे तर भारताबरोबरही अनेक दशकांपासून चीनचा सीमावाद सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 12:19 pm

Web Title: nepal protesters burn xi jinpings effigy against chinese encroachment dmp 82
Next Stories
1 Video: लोकल आणि एक्सप्रेसची धडक; थरकाप उडवणारा अपघात CCTV मध्ये कैद
2 औद्योगिक उत्पादन सात वर्षांच्या तळात
3 कार्तिक पौर्णिमेसाठी अयोध्येत लाखो भाविक दाखल
Just Now!
X