देशात बलात्काराच्या घटना वाढत असल्यामुळे नेपाळ सरकारने पॉर्नोग्राफीक कंटेटची निर्मिती करणाऱ्या पॉर्न वेबसाईटस ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही बंदी अंमलात येईल असे नेपाळ सरकारने शुक्रवारी सांगितले.

पॉर्नोग्राफीक कंटेटमुळे बलात्कार वाढत आहेत असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मागच्या काही महिन्यात नेपाळमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.

नेपाळमध्ये नुकतीच एका शालेय विद्यार्थिनीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. पण पोलीस यंत्रणेला अद्यापपर्यंत आरोपींना शासन करता आलेले नाही. या घटनांच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने पॉर्न वेबसाईटसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.