पेट्रोल व इतर वस्तूंचा पुरवठा थांबवून भारताने आमची कोंडी केली, तर नाइलाजाने रसद पुरवठय़ासाठी आम्हाला चीनकडे वळावे लागेल, असा इशारा नेपाळने आज दिला आहे.

नेपाळमध्ये नवी राज्यघटना स्वीकारण्यात आली असून तेथे हिंदू राष्ट्राऐवजी धर्मनिरपेक्ष राष्ट्र जाहीर करण्यात आले आहे. यामुळे तेथील मधेशी लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे. नेपाळचा तिढा लवकरच सोडवला जाईल असे आश्वासन नेपाळच्या नेत्यांना भारताने दिले आहे, अशी माहिती नेपाळचे राजदूत दीपकुमार उपाध्याय यांनी दिली. भारताने नेपाळशी संबंध सुधारण्यासाठी महिना, तास, आठवडे अशी काहीतरी मुदत द्यावी अशी आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. नेपाळला भारताने जास्त अडचणीत आणू नये असे सांगून ते म्हणाले की, तसे केले तर नाइलाजाने चीनसह इतर देशांची मदत घेणे आम्हाला भाग पडेल. नेपाळमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबवला असून दसरा व दिवाळीच्या आधी हा तिढा सोडवला जाईल.
मदत रोखल्यानेच निदर्शने
भारताने भूकंपात नेपाळला मदत केली. नेपाळमधील लोकांनी त्याची प्रशंसा केली व धन्यवाद दिले, पण आता भारताने पुरवठा रोखला असून त्यामुळे लोक निदर्शने करीत आहेत व ते स्वाभाविक आहे.