“नथुराम गोडसे आमच्या मनात वसतात” असं म्हणत सुभाषचंद्र बोस यांच्या पणती राज्यश्री चौधरी यांनी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या फोटोची पूजा केली. तसंच नथुराम गोडसेची आरतीही केली. या घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यश्री चौधरी या हिंदू महासभेच्या नेत्या आहेत. त्यांनी त्यांच्या काही समर्थकांसह महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामाच्या फोटोची आरती केली आणि पूजाही केली. एएनआयने दिलेल्या वृत्तात राज्यश्री चौधरी या नथुराम गोडसेच्या फोटोची पूजा करताना दिसत आहेत. तसंच इंडियन एक्स्प्रेसनेही या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये दौलतगंज भागात असलेल्या हिंदू महासभेचा कार्यालयात नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेची चौधरी यांनी पूजा केली. जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारमुळे गांधींजीची हत्या झाली, असा आरोप चौधरी यांनी केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हिंदू महासभेविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी पोलिसांना दिले होते. राज्यात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण मुळीच सहन केलं जाणार नाही असाही इशारा त्यांनी दिला होता.

काँग्रेस नथुराम गोडसेची विचारसरणी आणि उदात्तीकरण मुळीच सहन करणार नाही असं कमलनाथ यांनी म्हटलं आहे. तसंच नथुरामाची पूजा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

हिंदू महासभा आधीही वादात

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच ३० जानेवारी रोजी हिंदू महासभेच्या काही सदस्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडे या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळी झाडली. त्यानंतर या पुतळ्याच्या आतील बाटली फूटून त्यातून लाल रंगाचा द्रव पदार्थ बाहेर पडल्याचं दिसत होतं. यावेळी पूजा पांडेसोबत असलेल्या लोकांनी नथुराम गोडसेचा जयजयकारही केला होता. गोळी झाडल्यानंतर पांडे यांनी महासभेच्या सदस्यांना आणि समर्थकांना मिठाई वाटली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netajis grand niece worships nathuram godse photo in gwalior scj
First published on: 21-11-2019 at 16:30 IST