इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शनिवारी पॅलेस्टाईन इस्त्रायलच्या संघर्षामध्ये इस्रायलसोबत उभे राहिल्याबद्दल विविध देशांचे आभार मानले आहेत. नेतान्याहू यांनी साथ दिलेल्या देशांचे ध्वज ट्विट करत आभार मानले आहेत. मात्र यामध्ये भारतीय तिरंगा नसल्याने अनेक युजर्सने नेतान्याहू यांच्यावर टीका केली आहे.

शनिवारी इस्रायलने गाझा पट्टीवरील हवाई हल्ल्याची निंदा केली होती. यानंतर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासच्या नेत्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला होता. इस्रायलने गाझा पट्टीत शनिवारी केलेल्या हवाई हल्ल्यात असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेचे कार्यालय असलेली एक इमारत पाडण्यात आली. या इमारतीत असोसिएटेड प्रेस व अल जझीरा यांच्यासह अनेक कार्यालये व घरे होती.

नेतान्याहू यांनी ट्वीटमध्ये इस्रायलचे समर्थन करणाऱ्या सर्व देशांच्या ध्वज ठेवत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. “दहशतवादी हल्ल्यांविरोधात इस्रायलच्या बाजूने उभे राहून आणि स्वसंरक्षणाच्या अधिकारास पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद,” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, या लढाईत अनेक भारतीय हे इस्रायलच्या बाजूने उभे असल्याचे चित्र आहे. तर पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याऱ्या भारतीयांची संख्या देखील मोठी आहे. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याच्या त्यांनी निषेध नोंदवला आहे.

या युद्धजन्य परिस्थितीच्या सुरूवातीपासून #IndiaStandsWithIsrael हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. आता नेतान्याहू यांच्या त्या ट्विटमध्ये भारताच्या ध्वजाचा समावेश  नाही आहे. तसेच त्यांनी इस्राईलला पाठिंबा दिल्याबद्दल भारताचे आभार मानले देखील मानले नाहीत. यामुळे भारतातील इस्त्रालयली समर्थक नेतान्याहू यांच्यावर चांगलेच भडकले आहेत.

भारतीयांनी इस्रायलला पाठिंबा दिल्यानंतरही भारताचे आभार का मानले गेले नाही असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. काही जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करायला हवी असे म्हणत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर नेतान्याहू यांच्या ट्विटमध्ये भारताचा ध्वज नसल्याने अनेक युजर्सने आपला रोष व्यक्त केला आहे.