अमेरिकन काँग्रेसच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आरोप चीनने फेटाळून लावला आहे. दुसऱ्या देशांच्या अंतर्गत विषयांमध्ये आपण कधीही हस्तक्षेप केलेला नाही असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून गुरुवारी सांगण्यात आले.

कुठला देश दुसऱ्या देशांच्या प्रश्नांमध्ये जास्त हस्तक्षेप करतो हे आंतरराष्ट्रीय समुदायाला चांगले माहित आहे असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सांगितले.

दोन्ही देशांचे संबंध आणखी खराब होतील असे वर्तन अमेरिकेने करु नये अशी विनंतीही गेंग यांनी केली. रिपब्लिकन पक्षाने चांगली कामगिरी करु नये यासाठी चीन अमेरिकन काँग्रेसच्या निवडणुकीत हस्तक्षेप करत होता असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत केला होता.