RBI violet Colour Rs 100 notes: १०, ५०, २००, ५०० आणि २००० रूपयांच्या नव्या नोटेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) लवकरच १०० रूपयांची नवी नोट बाजारात आणली जाणार आहे. नव्या नोटेचा रंग हलकासा जांभळा आहे. यामध्ये गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीचे छायाचित्र असेल. नवी नोट बाजारात आल्यानंतर जुनी नोटही चलनात राहील. या नोटेच्या डिझाईनला म्हैसूरच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. याच प्रेसमध्ये २००० रूपयांच्या नव्या नोटांची छपाई होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाराने ही नोट सध्या अस्तिवात असलेल्या १०० रूपयांच्या नोटेपेक्षा छोटी आणि १० रूपयांच्या नोटेपेक्षा मोठी असेल. ‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार १०० रूपयांच्या नव्या नोटेच्या छपाईचे काम देवासच्या प्रेसमध्ये सुरूही झाले आहे. म्हैसूरमध्ये सुरूवातीचे नमुने छापण्यात आले होते. या नोटेमध्ये विदेशी शाईचा उपयोग केला होता. देवास प्रेसमध्ये देशी शाईचा वापर केला जाणार आहे.

ही नवी नोट ऑगस्ट अखेरपर्यंत बाजारात येऊ शकते. या नोटेचे वैशिष्ट्य म्हणजे ही नोट होशंगाबादच्या सिक्युरिटी पेपर मिलच्या स्वदेशी पेपर आणि शाईने छापली जाणार आहे. नव्या नोटेबाबत देवास प्रेसच्या व्यवस्थापनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ५०० आणि १००० रूपयांची नोट बंद करण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर आरबीआयने २००० आणि ५०० रूपयांची नवी नोट जारी केली होती. आरबीआयकडून १०, ५०, २००, ५०० आणि २००० रूपयांच्या नव्या नोट जारी करण्यात आल्या आहेत. आता १०० रूपयांची नवी नोट ही लवकरच प्रसिद्ध केली जाईल. यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये २०० रूपयांची नवी नोट जारी करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New 100 rupees note by rbi will be market very soon
First published on: 17-07-2018 at 19:08 IST